Tuesday, January 6, 2015

HINDUISM


🚩जय श्री राम बंधुओ🚩

मला अभिमान आहे हिंदू असल्याचा.. का?

अहो असणारच.. एवढं स्वातंत्र्य जे मिळतंय.. काही बोला, काही करा, आपण मोकाटंच..

आता शंकराचार्यांचा विषय घ्या ना.. साईबाबांच्या वक्तव्यावर शंकराचार्यांवर खटला दाखल करणार आहेत, त्यांना शंकराचार्य या पदावरुन हटवा असं अनेक हिंदु लोक सांगत आहेत. मला मुळात या वादाच्या खोलात जायचंच नाहीये. सांगायचं फक्त एवढंच आहे की आपल्या हिंदु धर्मात एवढी सूट आहे की तुम्ही शंकराचार्यांवर टिका करु शकतो, त्यांच्यावर खटले भरु शकतो.. इतर पंथांच्या पंडितांनी जर एखादं वक्तव्य केलं तर कोणाची हिंम्मत आहे का असं करायची???
पण आपल्यात ती सूट.. ते freedom आहे. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. सावरकरांनी काशीच्या पंडितांची तुलना माकडांशी केली होती (माकड सम्मेलन, भाकड सम्मेलन, अशा पद्धतीचा लेख लिहिला होता सावरकरांनी) तेव्हा सावरकरांवर पुष्कळ टिका झाली. अनेक स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. पण त्यांना सनातन्यांनी दगडाने ठेचून नाही मारलं.

आजही हिंदुत्व हा शब्द उच्चारताच सर्वात आधी नाव येतं ते सावरकरांचं. हा आहे माझा हिंदु धर्म. माझ्या हिंदु धर्मात अनेक वाईट चालीरिती असतील, अनिष्ट प्रथा असतील, मान्य.. पण त्या प्रथा मोडून काढायला माझ्या धर्मात प्रत्येक वेळी महापुरुषांनी जन्म घेतलाय. ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, महात्मा फुले, आंबेडकर, बुद्ध, महावीर, सावरकर, रानडे अजून किती नाव घेऊ? अहो नाव घेता घेता आयुष्य संपेल पण नावं काही संपणार नाही. हा माझा flexible हिंदु धर्म.

इथे तुम्हाला कुणावरही टिका करायचा अधिकार आहे (म्हणून डोके बाजूला ठेऊन टिका करु नये, आपला हशा होतो). हिंदु धर्म हा सनातन धर्म.. अनेक परकिय आक्रमक आले, आमच्यावर चालून..

जगातले जवळ जवळ सगळे पंथ या धार्मिक (राजकिय नव्हे, राजकिय महत्वाकांक्षा होतीच, पण त्या महत्वाकांक्षेला धार्मिकतेची विकृतीही होती) आक्रमकांनी नेस्तनाबूत केली. पण माझा हिंदु धर्म काही नष्ट झाला नाही. शक, कुशाण, हुण, इस्लाम, ख्रिश्चियन, इंग्रज, पोर्तूगीज किती आक्रमकची नावे घेऊ? या सर्वांनी भारताच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यांना यश मिळालंही. पण हिंदु धर्म पूर्णपणे नष्ट नाही करता आला. कारण हा सनातन धर्म.
अहो एका धर्मातून दुसर्‍या धर्मात जाता येते ही शिकवणच आमच्या गौतम बुद्धांनी दिली. त्याचे अनुसरण कदाचित जगाने केले असावे. पण बुद्धांची सहनशिलता त्यांना घेता आली नाही. रक्ताचे पाट वाहिले. असो.. मुळ विषय हिंदु धर्माचा आहे. हिंदु धर्म नष्ट झाला नाही, होणार नाही. ज्यांना तो नष्ट करायचाय.. त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाही (संदर्भ : पापस्थान आणि इराकच्या आतंकवाद्यांनी जो नकाशा प्रकाशित केला त्यात भारत इस्लामी राष्ट्र म्हणजेच त्यांना भविष्यात काबीज करावयाचे राष्ट्र दाखवले आहे).

लक्षात ठेवा ज्या दिवशी या पृथ्वीतलावरुन शेवटचा हिंदु संपेल, तो या पृथ्वीचा शेवटाचा दिवस असेल.. कारण जर हिंदु मेला तर सहनशीलता मेली.. फक्त राक्षसांचे राज्य.. आणि राक्षसांच्या राज्यात काय होतं हे काही सांगायला नकोच.. पण हिंदु नष्ट हॊणारच नाही.. कारण राक्षसांना मारण्याचा इतिहास आहे आमचा… आम्हा हिंदुंमधलं रामतत्व जागायला वेळ लागणार नाही आणि ज्यावेळेला ते जागेल तेव्हा रावणाचा अंत निश्चित आहे समजा..(कृपया वरील पोस्ट स्वतःच्या पंथाला लावून घेऊ नका. मी स्पष्टपणे यात पापस्थान आणि इराकचा उल्लेख केला आहे. काही लोकांना रडगाणे गायची सवय असते म्हणून म्हटले)

– जयेश शत्रुघ्न मेस्त्री

No comments:

Post a Comment